27.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriसंगमेश्वर स्थानकावर ९ गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

संगमेश्वर स्थानकावर ९ गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

या स्थानकात दररोज सुमारे १६०० प्रवासी ये जा करतात. 

संगमेश्वर स्थानकात लांब पल्लूयाच्या ९ गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी गेले अनेक महिने होत आहे. या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने येत्या स्वातंत्र्यदिनी संगमेश्वर स्थानकात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिली आहे. संगमेश्वर हा तालुका भौगोलिक दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून सुमारे १९६ गावे असलेल्या या तालुक्यातील जनतेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. वर्षाला सर्वाधिक सुमारे ५ कोटी ३७ लाख हुन उत्पन्न देणाऱ्या या स्थानकात दररोज सुमारे १६.०० प्रवासी ये जा करतात.

या प्रवाशांना खरं तर सध्यस्थितीत असणाऱ्या गाड्या खूपच कमी पडत आहेत याचाच विचार करून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर यां फेसबुक ग्रुप ने संघर्ष करून गतवर्षी नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळवला. गुजरात, दिल्ली, तामिळनाडूकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी एक तरी गाडी या स्थानकात थांबणे अपेक्षित आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न देत असतानाही कोकण रेल्वे प्रशासन इथल्या प्रवाशांच्या मागण्याना योग्य प्रतिसाद देत नाही असा आरोप प्रवासी करत आहेत. या स्थानकावर ९ गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरूद्ध १५ ऑगस्टला १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण आपण करणार असल्याचे संदेश जिमन यांनी जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular