मडगाव वांद्रे एक्सप्रेस व मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला खेड येथे थांबा मिळण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. खेड हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दापोली मंडणगड खेड येथील प्रवासी खेड रेल्वे स्टेशनचा वापर करतात. मात्र खेड येथे या ट्रेनला थांबा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच इतर विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
तसेच थांबा न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वैभव खेडेकर यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. यावेळी वेळी शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, कामगार सेना चिटणीस संजय आखाडे, उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष मिलिंद नांदगावकर, आणि ‘कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.