22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaकेंद्रातून इंधनावरील कर कमी करण्याची मागणी

केंद्रातून इंधनावरील कर कमी करण्याची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचे सांगितले.

अनेक जिल्ह्यातून इंधन दरवाढीचा विरोध होत आहे. अनेक ठिकाणी विविध पक्षांतर्गत जिल्हा स्तरावर निवेदन दिली जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रामधून जेवढा कर केंद्राला जातो परंतु, तेवढ्या प्रमाणात परतावा मात्र मिळत नाही, अशी खंत देखील अजित पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र फक्त देतोच आहे पण रिटर्न्स त्यामानाने काही नाही मिळत.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. इंधन दरवाढीवरून भाजपकडून महाविकास आघाडीवर आरोप केले जात आहेत. परंतु केंद्रानेही कर कमी करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. परिस्थितीमुळं कधीकधी अशक्य वाटणारे निर्णय घेण्याची वेळ येते असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं. इंधन दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांना आवाहन करताना इंधनावरील कर कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

राज्य सरकारकडूनही मोदींना प्रत्युत्तर देण्यात आले होते. आज अजित पवार यांनी इंधन कर कमी करण्यावर चर्चा होईल, असे सांगितले. २०१७ मध्येच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारची सगळी तयारी झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. यावर बोलत असताना अजित पवार यांनी या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

२०१७ च्या मुद्द्यावर शेलार आता का बोलत आहेत?  महत्त्वाचे मुद्दे सोडून शेलार बाजूला का जात आहेत?  असा खरमरीत प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींवर चर्चा करून आता काय मिळणार आहे? त्यामुळे मुलभूत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

RELATED ARTICLES

Most Popular