27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये ई-कोर्ट संकल्पना

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये ई-कोर्ट संकल्पना

नव्या ई-न्यालयालयाच्या संकल्पनेमुळे बंदिवानांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

विविध लहान मोठ्या गुन्ह्यांमध्ये अनेक गुन्हेगार कैदी रत्नागिरी कारागृहामध्ये आहेत. गुन्ह्यांसाठी न्यायालयामार्फत ठराविक कालावधीनंतर गुन्ह्यांशी संबंधित कार्यवाहीसाठी तारखा दिल्या जातात. मग पोलीस गुन्हेगारांना घेऊन त्या तारखांना न्यायालयात हजेरी लावतात.

तारखांना वारंवार कोर्टात जायला लागू नये, अत्यावश्यक वेळी थेट कारागृहातूनच न्यायाधीशांशी संवाद साधता यावा, या हेतूने कारागृह प्रशासनाकडून ई-कोर्ट संकल्पना राबविण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र खोली तयार करण्यात येणार आहे. ही खोली न्यायालयाच्या प्रतिमेसारखी तयार केली जाणार आहे. या ठिकाणी आल्यावर बंदिवानाला आपण कोर्टातच आहोत याची जाणीव होईल, अशा पद्धतीने हे ई-कोर्ट असणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाकडून देण्यात आली.

मुळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंदिवान न्यायालयाशी संवाद साधणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही ई कोर्ट तयार केली जाणार आहे. यामुळे पोलिस आणि न्यायालय यांच्या वेळेचीही बचत होणार आहे. ज्या केसेसबाबत ई कोर्टव्दारे संवाद साधणे शक्य आहे अशा केसेस या ठिकाणी सुनावणीसाठी घेतल्या जातील तर ज्या केसेसमध्ये प्रत्यक्षात न्यायालयात न्यावे लागणार आहे, अशा वेळी न्यायालयात नेले जाणार आहे.

नव्या ई-न्यालयालयाच्या संकल्पनेमुळे बंदिवानांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न मार्गी लागणार आहे. बंदिवानांना कोर्टात नेण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागत होते. ई कोर्ट संकल्पनेची अंमलबजावणी पुढील अल्पावधीतच सुरु होणार असल्याची माहिती प्राप्‍त झाली आहे. त्यामुळे नेमके ई कोर्ट कसे असेल, या बाबत आता कारागृह कर्मचार्‍यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular