31 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसाडवली येथील वृद्ध महिलेची सोन्याचा ऐवज लांबवून फसवणूक

साडवली येथील वृद्ध महिलेची सोन्याचा ऐवज लांबवून फसवणूक

आत्ताच या परिसरात चोरी झाली असून तुम्ही सोन्याचे दागिने असे अंगावर घालून फिरू नका असे सांगितले.

ग्रामीण भागामध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. काही ठिकाणी वृद्ध, लहान मुलांना हेरून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडण्याचे प्रकार वाढत आहेत. ज्याप्रमाणे रत्नागिरी मध्यवर्ती भागामध्ये पोलीस असल्याची वल्गना करून एका महिलेला लुटण्याचा प्रकार घडला होता, त्याप्रमाणेच आपण पोलिस इन्स्पेक्टर आहोत असे सांगून देवरुख साडवली येथील वृद्ध महिलेकडील दोन सोन्याच्या पाटल्या व दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना साडवली-सह्याद्रीनगर येथे शनिवारी ता. १५ घडली.

भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. देवरूख पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत धीरज देसाई यांनी देवरूख पोलिसात खबर दिली आहे. धीरज देसाई यांची आई कल्पना अनंत देसाई या शनिवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास देवरूख- संगमेश्वर या मुख्य रस्त्यावरून जात होत्या.

याच वेळी एका इसमाने त्यांना आपण पोलिस इन्स्पेक्टर आहोत असे सांगितले. आत्ताच या परिसरात चोरी झाली असून तुम्ही सोन्याचे दागिने असे अंगावर घालून फिरू नका असे सांगितले. हातातल्या बांगड्या व पाटल्या काढून कागदात ठेवण्यास सांगितले. याचवेळी या व्यक्तीने हातचलाखी करत सोन्याच्या बांगड्या ताब्यात घेत नकली बांगड्या कल्पना देसाई यांच्याकडे सुपूर्द केल्या.

कल्पना देसाई या घरी गेल्यानंतर दागिने तपासले असता, कागदामध्ये नकली बांगड्या आढळून आल्या. त्यांनी हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्यक्तीला दुचाकीवरील दोन जणांनी सहकार्य केल्याचे आढळले आहे. चोरट्यांविरोधात देवरूख पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular