27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू...

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...
HomeChiplunपरशुराम घाटात पाण्यासाठी धबधब्याची रचना...

परशुराम घाटात पाण्यासाठी धबधब्याची रचना…

धोकादायक दरडीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाय योजना केल्या जात आहेत.

पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या परशुराम घाटात गॅबियन वॉल आणि लोखंडी जाळी मारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम मार्गी लागल्यानंतर घाटातील दोन्ही मार्गावरून वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. घाटातील नव्या बांधकामामुळे दोन कृत्रिम धबधबे तयार झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना आकर्षण वाढणार आहे. प्रत्यक्षात हे धबधबे नसून, घाटात धोकादायक ठिकाणी वाहून येणारे पाणी टप्प्याटप्प्याने खाली यावे व त्याचा वेग कमी व्हावा या हेतूने त्याची रचना केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाय योजना केल्या जात आहेत. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने या कामासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरडीच्या खालच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम १५ जूनपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे.

या कालावधीत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीचा दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम आहे. आता धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जात आहे. या कामामुळे रस्त्यावर येणारी माती आणि भल्यामोठ्या दगडचा धोका काही अशी कमी होईल. लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी जागोजागी खडकात व दरडीच्या भागात आठ ड्रील मशीनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवल्या जात असून त्यावर जाळी बसवली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम गतीने सुरू आहे.

सुरुवातीला सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या साह्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे. गॅबियन वॉलच्या माध्यमातून मजबुतीकरणाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. अजून काही दिवसांत हेही काम पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले होतील.

RELATED ARTICLES

Most Popular