29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRatnagiriरत्नागिरी-सिंधुदुर्गवर झेंडा फडकवण्याचा निर्धार, भाजपकडून आगामी लोकसभेची तयारी...

रत्नागिरी-सिंधुदुर्गवर झेंडा फडकवण्याचा निर्धार, भाजपकडून आगामी लोकसभेची तयारी…

प्राबल्य असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार सोमवारी (ता. २७) झालेल्या सभेत भाजपकडून करण्यात आला आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे, महाजनसंपर्क अभियानातून तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी या सभेने अधिक गती अन् बळ मिळणार आहे. या निमित्ताने भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला लक्ष करत आगामी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व राखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त मतदार संघातून खासदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी राजापूरमध्ये भाजपने सभेचे आयोजन केले होते.

नेत्यांच्या भाषणांतून आगामी लोकसभा निवडणुकीचे ढोल आतापासूनच वाजू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या नऊ वर्षामध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेली लोककल्याणकारी कामे आणि राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजप महाजनसंपर्क अभियान राबवत आहे. या अभियानातर्गंत झालेल्या भाजपच्या सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, अभियान राज्य प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेमध्ये मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला गेला. यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी आपल्याला हक्काचा खासदार, आमदार निवडून आणायचा आहे. त्यासाठी कामाला लागा, घराघरात पक्ष संघटना आणि पंतप्रधानांचे काम पोहोचवा, असे आवाहन केले. विजयासाठी संघटनात्मक मोर्चेबांधणी करताना नेमके कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे, यावर कार्यकत्यांना दिशा दिली. कोकण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा जनतेसमोर लेखाजोखा मांडा असे सांगण्यात आले. तसेच ठाकरे शिवसेनेच्या विरोधात कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असेही सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular