देशात व राज्यात महिला अत्याचार प्रकार वाढत चालले आहे. बदलापूर येथील प्रकरण ताजे असतानाच संगमेश्वर तालुक्यात संतापजनक हादरवून टाकणारी तसेच गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारीघटना घडली आहे. तालुक्यातील वांद्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकच भक्षक बनल्याने तालुकाभरात संताप व्यक्त होत आहें. संजय मुळ्ये नाव असलेला शिक्षक हा पाचवी व सहावी वर्गात शिकणाऱ्या तीन ते चार मुलींचा विनयभंग करत असल्याची घटना समोर आली असून त्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील एका शाळेतील संजय मुळ्ये नावाचा शिक्षक हा काही दिवसांपासून त्याच शाळेतील पाचवी व सहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी बरोबर अश्लील वर्तन व शारीरिक छेडछाड करत असल्याचे पुढे आले आहे. त्या पीडित मुलींनी कंटाळून सारा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच ग्रामस्थांच्या सभेचे तातडीने आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्या शिक्षकाला मुलींनी केलेल्या तक्रारी संदर्भात जाब विचारले असता. या शिक्षकाने असे कृत्यच केले नाही, अशा थाटात उत्तरे देत होता. त्यामुळे उपस्थित पालक व ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले.
आपण करत असलेल्या बनवाबनवी मुळे उपस्थित आक्रमक होताहेत हे पाहून आपले काही खरे नाही आपण कितीही उलट्या बोंबा मारल्या तरी काही उपयोग नाही आ पले बिंग तर फुटलेय कितीही उलट्या बोंबा मारल्या तरी यातून सहीसलामत आपण सुटू शकत नाही. आणि जर उपस्थित्यांच्या रागाचा पारा चढला तर मात्र नको ते होईल न पेक्षा खरं ते मान्य करून माफी मागून सुटका करावी या उद्देशाने की काय नको ते कृत्य करून शिक्षकी पेशाला आणि गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना करणाऱ्या त्या नराधम शिक्षकाने सत्य ते ओकून माफीची दयावया सुरु केली. ही घटना काही वेळातंच सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि जमाव वाढू लागला. पालक, व ग्रामस्थांनी पूर्णपणे संयम राखत घडलेल्या घटनेमुळे अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत घड़लेल्या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिस तसेच रत्नागिरी पोलिसांना दिली.
प्रकरण गंभीर असल्याने डी. वाय. एस. पी. तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत त्या नराधम शिक्षकाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याला संगमेश्वर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी आणले. यावेळी पोलीस ठाणे आवारात सुद्धा मोठा जमाव जम ला होता. घडलेल्या घटनेमुळे अनुचित प्रकार व कोणताही उद्रेक होऊ नये या करिता रत्नागिरी येथून ३० आरसीपी पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली होती. जमलेला जमाव हा शांतच होता. डीवायएसपी माईन यांनी जमावाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १७५ (१) (१),७५ (१),४ पोस्को अधिनियम ८,९ (क),१०,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.