30.4 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeSindhudurgमोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर सापडला मुहूर्त

मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर सापडला मुहूर्त

गेले पाच-सहा महिने या कामाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने मोती तलावाचे सौंदर्य बाधित झाले होते.

सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मोती तलावात असलेला गाळ काढण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकजूट दाखवली होती. यासाठी येथे पालिकेमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठकीही पार पडली होती. या बैठकीला राजघराण्याचे युवराज लखमराजे सुध्दा उपस्थित होते. परंतु, गाळ काढताना तो चुकीच्या पद्धतीने काढल्याने मोती तलावाचा एका बाजूचा कठडाच ढासळला होता. एकूणच यामुळे नजीकच्या मुंबई-गोवा महामार्गाला धोका निर्माण झाला होता.

कठडा कोसळल्यानंतर अनेक नागरिकांनी पालिका प्रशासन व बांधकाम विभागाला दोषी धरून याबाबत आवाज उठविला होता. कठड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणीही लावून धरली होती; मात्र गेले पाच-सहा महिने या कामाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने मोती तलावाचे सौंदर्य बाधित झाले होते. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अलीकडेच कठड्याचे काम हाती घेण्यात यावे, यासाठी सह्यांची मोहीम घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

अखेर त्यांच्या कष्टाला यश मिळाले असून, चुकीच्या पध्दतीने गाळ काढल्याने कोसळलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. गेली कित्येक महिने भग्नावस्थेत असलेल्या कठड्याची दुरुस्ती आणि बांधकाम लवकरात लवकर होण्यासाठी अनेकांनी आवाज उठविला होता.  अखेर आज शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते कठड्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी ५०-५० लाखाच्या दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाला शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेविका दीपाली सावंत, माजी नगरसेविका माधुरी वाडकर, तानाजी वाडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular