26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeMaharashtraपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा

ज्या वेळी माझा प्रवेश शिंदे गटात होईल त्यावेळी उद्धव ठाकरे त्या स्टेजवर असतील" सय्यद यांच्या या विधानामुळं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. मला एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आणलं. ते जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. माझी पक्षप्रवेशाची तारीख ठरली होती, ती काही कारणास्तव पुढं गेली आहे. मात्र लवकरच माझा प्रवेश होईल.

शिवसेना नेत्या व अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पुढे म्हटले आहे की,  शिंदे गटात प्रवेश करण्याची माझी तारीख पुढे गेली असली तरी मी लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा.

ठाकरे गट सोडण्याच्या कारणाबाबत दिपाली सय्यद म्हणाल्या की, ही गद्दारी नाही, हा हक्क आहे, एक राजा असतो आणि त्याच्या आजूबाजूला सेनापती, सैनिक असतात, त्यांचेही काही अधिकार असतात. त्यांच्या नंतर माझ्या पदरी काय पडणार आहे. पण तुम्ही फक्त हुलकावणी देणार असाल तर कसं होणार, असंही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना सांगितल की, “माझा प्रवेश होणार होता मात्र काही अडचणींमुळं तो होवू शकला नाही, माझ्या प्रवेशाला कोणाचाही विरोध नाही” तर त्या पुढे म्हणाल्या की, “ठाकरे गटात मला पाहिजे तशी साथ मिळाली नाही, माझी इच्छा आहे की, माझ्या सोबत उद्धव ठाकरेंनी देखील शिंदे गटात प्रवेश करावा, ज्या वेळी माझा प्रवेश शिंदे गटात होईल त्यावेळी उद्धव ठाकरे त्या स्टेजवर असतील” सय्यद यांच्या या विधानामुळं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असून चर्चांना उधाण आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular