21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeKokan“ही” एक्सप्रेस २५ नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनसह धावणार

“ही” एक्सप्रेस २५ नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनसह धावणार

२५ नोव्हेंबर पासून ही एक्स्प्रेस विजेवर धावणार असल्याने आता प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाल्यावर टप्प्या टप्प्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या विजेवर धावणार आहेत. आता तेजस एक्सप्रेसही विद्युतभारीत इंजिनसह धावणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्यां पाठोपाठ ऑगस्ट महिन्यापासून प्रवासी गाड्या देखील विद्युत इंजिनासह चालवल्या जाणार आहेत. २५ नोव्हेंबर पासून ही एक्स्प्रेस विजेवर धावणार असल्याने आता प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत देशातील पहिली तेजस एक्सप्रेस मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अखत्यारितील मुंबई सीएसएमटी ते करमाळी दरम्यान धावली. मोठ्या दिमाखात ही वातानुकलीत आलिशान गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे. आणि आताच हाती आलेल्या वृत्तानुसार हि गाडी देखील आता विद्युत इंजिनासह चालवण्यात येणार आहे.

रेल्वेकडून प्राप्त ताज्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावर धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विकली एक्सप्रेस (२२११५/२१६), मुंबई सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्सप्रेस (२२११९/२२१२०) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली (२२११३/२११४) या गाड्या देखील आता विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यातील २२११५/२२१६ ही एक्सप्रेस गाडी दिनांक २४ नोव्हेंबरपासून तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस दिनांक २५ नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवली दरम्यान धावणारी तिसरी एक्सप्रेस गाडी दिनांक २६ नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग तळकोकणात थांबणाऱ्या या गाडीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आलिशान तेजस एक्सप्रेस २५ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. रेल्वेने तेजससह इतर दोन एक्सप्रेस गाड्या देखील विद्युत इंजिनसह चालवण्याचे नियोजन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular