26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeInternationalअभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

दीपिका पादुकोण २०२२ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ च्या कॉम्पिटीशनमध्ये ज्यूरी मेंबर म्हणून सहभागी होणार आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२२ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ च्या कॉम्पिटीशनमध्ये ज्यूरी मेंबर म्हणून सहभागी होणार आहे. या वर्षी इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधून कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये मेंबर म्हणून सहभागी होणारी दीपिका भारतातली एकटी अॅक्टर आहे. या वर्षीच्या ७५ व्या फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यूरीला फ्रेंच अॅक्टर विनसेंट लिनडन हेड करणार आहे. हा फेस्टिवल १७ ते २८ मे २०२२ या कालावधीत होणार आहे.

दीपिका पादुकोण ज्या ज्यूरीची मेंबर आहे, तिथे एकूण ८ जज असतील. हे ज्यूरी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या २१ चित्रपटांतील एका चित्रपटाला शनिवारी २८ मे रोजी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये पाम अवॉर्ड दिला जाईल. ज्यूरीच्या इतर सदस्यांमध्ये फिल्म मेकर रेबेका हाल, स्वीडिश अॅक्टर नूमी रैपेस, इटालियन अॅक्टर जैसमिन ट्रिंका, ईरानी फिल्ममेकर असगर फरहादी, फ्रेंच फिल्ममेकर लैज ली, जेफ निकोलस आणि डायरेक्टर वाकहिम ट्रियर हे सर्व सहभागी होतील.

दीपिका पादुकोणच्या कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये सहभागी होण्याची बातमी कळताचं, सोशल मीडियावर दीपिकाचे चाहत्यांनी तिच्यावर भरभरुन शुभेच्छाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दीपिका पादुकोणच्या याआधी इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधून अरूंधति रॉय, ऐश्वर्या राय, मृणाल नायर, मीरा नायर, नंदिता दास, शर्मिला टागोर, शेखर कपूर आणि विद्या बालन हे कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्यूरी म्हणून सहभागी झाले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिका ‘गहराइया’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे सोबत दिसून आली होती. आता लवकरंच ती शाहरूख खानसोबत पठान चित्रपटात दिसून येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular