27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeRatnagiriरत्नागिरीकरांची अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहाने सण साजरे करावेत -...

रत्नागिरीकरांची अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहाने सण साजरे करावेत – पोलिस अधीक्षक डॉ.गर्ग

रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यातील हे प्रेम आणि सलोखा कायम राहावा,  असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीकरांना केले आहे. राज्यात सुरु असलेले मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजावरून सुरु असलेले राजकारण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले ईदीच्या दिवशी ३ मेचे अल्टीमेटम त्यामुळे काही गोंधळ माजू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  बुधवारी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी शहर पोलिस स्थानक अंतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय मुस्लिम समाजाने जाहीर केला. शांतता कमिटीच्या सदस्यांनी मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे कौतुक केले.

बुधवारी पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३ मे रोजी रमजान ईद, अक्षय्य तृतीया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. डॉ.गर्ग यांनी उपस्थितांना आवाहन केले कि, रत्नागिरीकरांची अनेक वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहामध्ये सण साजरे करावेत.

रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल, तर इतर वेळीसुद्धा मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून,  त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसामध्येच करण्यात येणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular