31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriजिल्हाध्यक्ष निवडीवरून मतभेद, रत्नागिरी राष्ट्रवादीत रंगले नाराजीनाट्य

जिल्हाध्यक्ष निवडीवरून मतभेद, रत्नागिरी राष्ट्रवादीत रंगले नाराजीनाट्य

जिल्हाध्यक्ष पदासाठी कुमार शेट्ये देखील इच्छुक होते; परंतु त्यांच्या ऐवजी सुदेश मयेकर यांची जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर जोरदार नाराजीनाट्य उफाळून आले आहे. रत्नागिरीत राष्ट्रवादीमध्ये पुन्हा उभी फूट पडण्याची शक्यता आहे. अडचणीच्यावेळी एकहाती पक्ष सांभाळला तरी पक्षाने आपला विचार केला नाही. त्यामुळे आपण नाराज असून वेगळा विचार करण्याचे समर्थकांचे मत आहे. पक्षाने याची गंभीर दखल घेतली नाही तर गंभीर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी दिला; परंतु जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी नाराजीबाबत खंडण केले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष म्हणून सुदेश मयेकर यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते मयेकर यांना दिले.

निवड झाल्यानंतर सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीतील ज्येष्ठांच्या गाटीभेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमातही ते पुढे होते. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. नगराध्यक्ष पोटनिवडणूक असो वा विधानसभा निवडणूक असो त्यांनी पक्ष अडचणीत असताना त्या निवडणुका लढवण्याचे धाडस दाखवले होते. जिल्हाध्यक्ष पदासाठी कुमार शेट्ये देखील इच्छुक होते; परंतु त्यांच्या ऐवजी सुदेश मयेकर यांची जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड शेट्ये यांच्या जिव्हारी लागली आहे.

कुमार शेट्येदेखील शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांनी पक्षाला उभारी आणि बळ देण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीत स्वखर्चाने पक्षाचे कार्यालय त्यांनी चालवून पक्षबांधणीचे काम केले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली तरी रत्नागिरीत त्यांनी पक्ष बांधून ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून ते इच्छुक होते; मात्र सुदेश मयेकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे ते प्रचंड नाराज आहे. याबाबत त्यांची भूमिका विचारली असता ते म्हणाले, ‘आपण पक्षाच्या निर्णयावर नाराज आहोत. आता सर्व. समर्थकांचे मत आहे की, आपण वेगळा विचार करायला हवा; परंतु मी वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. पक्षाने याची दखल घेतली नाही तर कार्यकर्त्यांना घेऊन गंभीर निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular