27.7 C
Ratnagiri
Friday, June 2, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeMaharashtra...... पुन्हा एकदा आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर

…… पुन्हा एकदा आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर

“A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच अशा कडक शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्यानंतर त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातही पडले आहेत. याप्रकरणी चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर यायला हवी अशी मागणीही रामदास कदम यांनी केली आहे. कोणाचे इतके कॉल आले, AU म्हणजे कोण हे कळले पाहिजे, याची चौकशी झालीच पाहिजे असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

नितेश राणे देखील यावेळी म्हणाले कि, या दोन्ही केसमध्ये आदित्य ठाकरेंचेच नाव का समोर येते ? दाल मै कुछ काला है म्हणून आदित्य ठाकरेंची चौकशी व्हायला हवी असं म्हणाले. काल शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील आदित्य ठाकरेंबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसून आले.

श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये ज्याप्रकारे आफताबची नार्को टेस्ट केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट करा सुशांत सिंह केसमधील सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केली. माध्यमांशी बोलताना राणे आदित्य ठाकरेंविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा आरोप करण्यात येत आहेत. “A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच अशा कडक शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. अदित्य ठाकरे यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular