21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeKhedभोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर, आणखी दोन गतिरोधक

भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर, आणखी दोन गतिरोधक

घाट उतरणार्‍या एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास ते वाहन संरक्षक भिंतीवर आदळून भिंत तुटू नये यासाठी बांधकाम विभागाने ही खबरदारी घेतली आहे.

महामार्गावर सततच्या घडणाऱ्या अपघातामुळे अनेकांनी जीव गमवले आहेत. वाहनंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्यावर काही तरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे. तीव्र उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन अपघातग्रस्त होते. वाहनाचे आणि वाहनातील सामग्रीचे नुकसान होते ते वेगळेच.

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाने आता आणखी दोन गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांची संख्या आता १२ झाली आहे. अपघातग्रस्त वाहने ज्या भिंतीवर आदळतात त्या संरक्षक भिंतीवर आता जुने टायर लटकवण्यात आले आहेत. घाट उतरणार्‍या एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास ते वाहन संरक्षक भिंतीवर आदळून भिंत तुटू नये यासाठी बांधकाम विभागाने ही खबरदारी घेतली आहे.

भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर आजपर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. या अपघातात काहींचा बळी तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. या वळणावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभाग थातुरमातूर उपाययोजना करून वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहन चालकांमधून केला जात आहे. महामार्गाचे काम पूर्ण होवून जेव्हा हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला तेव्हापासून या वळणावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दर दोन दिवसाआड घाट उतरणारी अवजड वाहने या वळणावर अपघात ग्रस्त होत असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular