32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...
HomeRatnagiriमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर वारेमाप खर्च, कॉंग्रेसची खर्च दाखवण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर वारेमाप खर्च, कॉंग्रेसची खर्च दाखवण्याची मागणी

याबाबत महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. अश्‍विनी आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसचे निवडक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने पालिकेच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच १६ डिसेंबर रोजी रत्नागिरी दौरा झाला. या दौयाची जय्यत तयारी करण्यासाठी नाहक खर्च करण्यात आल्याचा आक्षेप कॉंग्रेसने घेतला आहे. खर्चासाठीची ठराव प्रत, कंत्राटदाराची नावे, त्यांना आदा केलेल्या रकमा आदींचा तपशील मिळावा, असे निवेदन महिला कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा १६ डिसेंबरला दौरा झाला. त्यापूर्वी शहराची स्वच्छता, रस्त्याचे काम, दुभाजकाची सफाई, रंगरंगोटी आदी अनेक तात्पुरत्या गोष्टी करून जय्यत तयारी करण्यात आली. मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नाहक खर्च पालिकेमार्फत करण्यात आला. असा आक्षेप महिला कॉंग्रेसने घेतला आहे.

याबाबत महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. अश्‍विनी आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसचे निवडक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने पालिकेच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी खर्चाचा तपशील मिळावा, खर्च करण्यात आला असेल तर त्याची ठराव प्रत द्यावी, त्या कंत्राटदाराची नावे मिळावीत, कंत्राटदारांना किती रक्कमा अदा केली त्याचा तपशील मिळावा, पालिकेच्या निवृत्त कामगारांची नावे मिळावीत, त्यांना किती रक्कम अदा केली त्याचा तपशील मिळावा.

जेवढे बॅनर पालिकेच्या हद्दीत लागलेले आहेत, त्याच्या भाड्यापोटी किती रक्कम मिळाली त्याची माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे पालिकेच्या उपमुख्याधिकार्‍यांकडे केली आहे. मुख्यमंत्री पदग्रहण केल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने, त्यांच्या गटातील मंत्र्यांनी जय्यद तयारी केली परंतु, त्यासाठी पालिकेचा पैसा, मनुष्यबळ किती खर्ची गेले याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular