26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriजिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांची बदली...

जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांची बदली…

कामगिरीच्या जोरावरच त्यांना गेल्या वर्षी "इंटरपोल "मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बढतीने बदली झाली आहे. अप्पर पोलिस आयुक्त विशेष शाखा मुंबई येथे त्यांची बदली झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी येथे २ वर्षे कर्तव्य बजावले. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकरणे त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली. मातीपरिक्षणादरम्यान नाणार प्रकल्पाविरोधातील चिघळलेले आंदोलन त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले. स्थानिक ग्रामस्थ पोलिसांना पाणी देखील देण्यास तयार नव्हते एवढा पोलिसांबाबत रोष होता. परंतु पोलिस अधीक्षक कुलकर्णी ही परिस्थिती उत्तम हाताळली. पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी सामान्य जनतेशी चांगले संबंध ठेवले होते. सामान्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. राजकीयदृष्ट्या जिल्हा अतिसंवेदनशील आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकसभा, विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.

पोलिस अधीक्षक कुलकर्णी चिपळूणचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तसेच रत्नागिरीचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या बॅचमधील आहेत. नगरमधील श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले धनंजय कुलकर्णी यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण भानगाव आणि श्रीगोंदे येथे झाले. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९८ मध्ये त्यांनी उपअधीक्षक म्हणून पोलिस खात्यातील सेवेस प्रारंभ केला. ऑगस्ट २०१४ पासून मे २०१६ पर्यंत ते मुंबई पोलिस आयुक्तांचे प्रवक्ते आणि जनसंपर्क अधिकारी होते. मुंबईतील गुन्ह्यांच्या अभ्यासामुळे आणि धडाडीमुळे जून २०१६ पासून धनंजय कुलकर्णी यांच्याकडे दहशतवादविरोधी उपायुक्तपद दिले. पथकाचे संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे २०१७ मध्ये संपूर्ण वर्षभर ते हैतीत संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे तेथील कामगिरीच्या जोरावरच त्यांना गेल्या वर्षी “इंटरपोल “मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

RELATED ARTICLES

Most Popular