27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...
HomeRatnagiriगणेशोत्सवासाठी दिवा - रत्नागिरी मेमू गाडी आजपासून धावणार

गणेशोत्सवासाठी दिवा – रत्नागिरी मेमू गाडी आजपासून धावणार

दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दररोज धावणार आहे

या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदाच दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू रेल्वेची पहिली फेरी बुधवारी (१३ सप्टेंबर) धावणार आहे. दि. २ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी दररोज धावणार आहे. या गाडीला आधी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये रायगडमध्ये सापे वामने, करंजाडी तसेच खेड तालुक्यात अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत. नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षी गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी १५६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गणेशोत्सवात मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे.

याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, आता गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमू स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत. दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी ०११५३/०११५४ या क्रमांकासह धावणार आहे. दि. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत या गाडीच्या ३९ फेऱ्या होणार आहेत.

ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी ७:१० वाजता ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीसाठी सुटणार आहे. ती दुपारी २:५५ वाजता रत्नागिरीत पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३:४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल. रोहा, माणगाव, वीर, सापे, वामने, करंजाडी, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड या थांब्यांवर ही गाडी थांबणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular