27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiri'आयुष्मान भव' योजनेचा आजपासून प्रारंभ - आरोग्य विभाग

‘आयुष्मान भव’ योजनेचा आजपासून प्रारंभ – आरोग्य विभाग

आयुष्यमान भव सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होईल.

भारतात बुधवारपासून (ता. १३) सर्वत्र आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही या योजनेची सुरुवात होणार असून, या अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, मेळावा, रक्तदान शिबिर, अवयवदान जागृती मोहीम. १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी, सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व नंतर राज्यस्तरावर १२ वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर जिल्हा पातळीवरील कार्यक्रम जिल्हा शासकीय रुग्णालयात होणार आहे. येत्या १७ सप्टेंबरपर्यंत सेवा सप्ताह साजरा होणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आशा कर्मचारी गृहभेटी देणार आहेत. त्यावेळी घरातील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयुष्यमान भव सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होईल. यात ग्रामपंचायत प्रशासन, जनआरोग्य समिती, रुग्णकल्याण समिती यांच्या साह्याने सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

या मोहिमेत लोकांकडून अवयवदानाची प्रतिज्ञा सर्व आरोग्यसंस्थांमध्ये व सभेमध्ये घेण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या अंतर्गत असंसर्गजन्य आजारसेवा, क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार, माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक, घसा तपासणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाने मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे. सर्व विभागांचे अधिकारी त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular