22.1 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeChiplunराज्यात आता निवडणुका होतील की नाही याबाबत शंका : आ. भास्करशेठ जाधव

राज्यात आता निवडणुका होतील की नाही याबाबत शंका : आ. भास्करशेठ जाधव

आ. भास्कर जाधव म्हणाले, पक्ष चोरले, निशाणी चोरली, आमदार चोरले, नेते चोरले.

प्रत्येक स्तरातील मतदारांना फसवून मतदान घेतले आहे त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात राज्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण असल्याचे सरकारने ओळखल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही याबद्दल उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शंका व्यक्त केली आहे. ते चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज्यात सरकारबद्दल प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण आहे. प्रत्येक टप्प्यावर झाले आणि सर्व स्तरांतील मतदारांना फसवून सत्ताधाऱ्यांनी मतदान घेतले. पण आता मतदार जागरूक झाला आहे, असे आ. भास्कर जाधव यांनी म्हटले. सध्याच्या परिस्थितीत सरकारला हे उमगले आहे की आगामी निवडणुका त्यांच्या दृष्टीने कठीण ठरणार आहेत. म्हणूनच या निवडणुका वेळेवर होतील की नाही, यावरच शंका निर्माण झाली आहे.

राज ठाकरेंचे काय ? – आ. भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत स्पष्ट मत व्यक्त करताना सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही कधीही ‘महाविकास आघाडी’ म्हणून लढलो नाही. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार की नाही, यावरून अनावश्यक चर्चा करण्याची गरज नाही. अशा चर्चामुळे आघाडीत मिठाचा खडा पडेल, असे काही नाही. राज ठाकरे यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यावेळी त्यांचा स्वतःचा पक्ष अस्तित्वात असतानाही त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. मग आता अडचण का होईल ? असा प्रश्न निर्माण करताना त्यांनी राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा आधार घेतला.

मतदारच चोरले – आ. भास्कर जाधव म्हणाले, पक्ष चोरले, निशाणी चोरली, आमदार चोरले, नेते चोरले… आता काय चोरायचं म्हणून त्यांनी मतदारच चोरले ! त्यामुळे राज्यात अशा चोरांना ठेवायचं का, हा विचार मतदारांनीच करण्याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular