26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraनितेश राणेंच्या "त्या" व्हिडिओला, शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

नितेश राणेंच्या “त्या” व्हिडिओला, शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दुसऱ्या दिवशी महा आघाडी सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकार विरोधात मोठमोठ्याने घोषणा देत बसले होते.

त्यामध्ये वीज बिलाचा प्रश्न, अनेकदा रद्द होणाऱ्या परीक्षा, पेपर घोटाळे, इत्यादी अनेक मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवरच घोषणा देत होते. त्याचवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जात असताना, नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… असे आवाज काढत जोरजोरात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. नितेश राणे स्वत:ही हसून आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा आनंद घेत होते.

नितेश राणेंच्या या विचित्र कृत्याचा आणि त्यावर कुत्सितपणे हसण्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर आला आहे. आता, राणेंच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे विधानपरिषद आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन राणेंना टोला लगावला आहे. आजही आजोबांची शिकवण नातू म्हणून महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली, कोणत्याही कामामध्ये मांजर आडव गेले तरी थांबू नये,  ही प्रबोधनकारांची थोर शिकवण!”, असे ट्विट कायंदे यांनी केलं आहे. त्यासोबतच, आठवणीने म्याऊ… म्याऊ… हा हॅशटॅगही देखील त्यांनी वापरला आहे. नितेश राणेंच्या विचित्र कृत्यावर शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलं नव्हतेच, मात्र,  आता मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन नितेश राणेंवर सडेतोड उत्तराने चांगलाच पलटवार केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular