अचानक डोळ्याच्या साथीच्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीवरील औषधांचा तुटवडा भासत आहे. परंतु जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून कोल्हापूरहून डोळ्याच्या ड्रॉप्सचे ३०० बॉक्स मागविण्यात आले आहेत. तसेच कुत्रा चावल्यावरील रेबिज इन्जेक्शनचाही अपुरा साठा असल्याचे रुणालय प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात सध्या डोळ्याच्या साथीचा प्रादूर्भाव आहे. काही दिवसांपासून या साधीचा फैलाव वाढत असल्याने आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये फक्त जिल्हा रुग्णालयातच सुमारे ५०० वर डोळ्याचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वेगळी आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढया मोठ्या प्रमाणात ही साथ फैलावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध साठा नव्हता. एकदम रुग्ण वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उपचारासाठी ड्रॉप्स टाकले जातात. या औषधांचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाकडेही डोळ्यावरील ड्रासचा औषध साठा उपलब्ध नसल्यामुळे धावपळ उडाली आहे. कोल्हापूरहून औषधाने ३०० बॉक्स मागवण्यात आले आहेत. ही औषधे आल्यानंतर त्याचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी याला दुजोरा दिला आहे. जिल्हा रुग्णालयालाही हा औषध सातः दिला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावण्यावरील रेबिज इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे एका रुणाची प्रचंड परवड झाली. त्याची रत्नागिरीपर्यंत फरफट झाली. अखेर सोमवारी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावण्यावरील १५ डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडेही कुत्रा चावल्यानंतर घ्यायच्या इंजेक्शनचा थोडाच साठा उपलब्ध आहे. एकूणच जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे रेबिज इंजेक्शनाची अपुरा साठा असून जास्त इंजेक्शन मागविण्यात आली आहेत. जिल्ह्यात डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. अचानक साथ पसरल्याने ड्रॉप्सचा तुडवडा आहे. परंतु आम्ही ते मागविले आहेत. पुरेसा साठा लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.