28.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeKhedमहामार्गावरी थांबलेल्या ट्रकला हुंडाई क्रेटा कारची जोरदार धडक, एक मृत्यूमुखी

महामार्गावरी थांबलेल्या ट्रकला हुंडाई क्रेटा कारची जोरदार धडक, एक मृत्यूमुखी

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीकच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असेलेल्या ट्रकला हुंडाई क्रेटा कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील एकाचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू ओढवला. सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट आल्याने, महामार्गावर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात घडला. झालेल्या या अपघातामध्ये मृत झालेल्या प्रवाशाचे नाव रामचंद्र लक्ष्मण कदम असे असून ते मालवण येथून मुंबईकडे परतत होते.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत बोरिवली येथे राहणारे रामचंद्र कदम हे आपल्या कुटुंबासह क्रेटा कारने मालवण येथे काही कामानिमित्त आले होते. येथील काम उरकल्यानंतर रविवारी रात्री पुन्हा ते मुंबईला परत जायला निघाले. रविवारी रात्री मालवण येथून निघालेले कदम ही महाड येथे काही काळ विश्रांतीसाठी थांबणार होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार भरणे नजीकच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर आली तेव्हा महामार्गावर परसलेल्या दाट धुक्यामुळे कार चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला आणि ती कार  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून जाऊन जोरात आदळली.

या अपघातात कारमधून प्रवास करणे ६२ वर्षीय रामचंद कदम हे प्रवाशी गंभीर जखमी झाले असून,  अपघाताची खबर मिळताच खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी व त्यांचे सहकारी आणि खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या रामचंद्र कदम यांना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने तासभर कदम यांना उपचारच मिळू शकले नाहीत.

कळंबणी येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने गंभीर जखमी झालेल्या कदम यांना उपचारासाठी मुंबई किंवा पनवेलला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना पनवेल येथील रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. कदाचित वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

मागील काही वर्षामध्ये हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असणाऱ्या ट्रकवर आदळून अनेक अपघात घडले  आहेत. रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ही वाहने महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना दिसत नसल्याने, या ठिकाणी वारंवार असे अपघात होत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहने पार्क करणाऱ्यांवर वाहतूक विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular