27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedकशेडी बोगदा बंद ठेवल्याने प्रवाशांची होतेय दमछाक

कशेडी बोगदा बंद ठेवल्याने प्रवाशांची होतेय दमछाक

१० मिनिटात बोगदा पार होत असताना परतीच्या प्रवासाला जुन्या मार्गवरील ४५ मिनिटे जास्त लागत असूनव इंधन सुद्धा जास्त लागत आहे.

खेड-पाच दिवसाचे गौरी गणपतीचा सण उत्साहात उरकत गणेशभक्त पुन्हा परतीच्या मार्गाला लागले आहेत. गावी येताना पोलादपूर बाजूकडून तळ कोकणात जाताना कशेंडी बोगद्यामधून प्रवास केला होता मात्र परतीचा प्रवास कशेडी बोगद्यातून नव्हे तर कशेडी घाट चढ उतारा करावा लागत असल्याने प्रवासी वर्गाचा वेळ व इंधन वाया जात असल्याने परतीचा प्रवाससाठी कशेडी बोगदा सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे. गणपती पूर्वी परिपूर्ण काम नसताना कशेडी बोगदा एकेरी मार्गिका सुरू करण्यात आली होती. हजारो वाहने या बोगद्याच्या माध्यमातून खेड रत्नागिरीकडे मार्गस्त झाली होती. या दरम्यान दोन दुचाकी स्लिप होऊन महिला जखमी झाल्याची घटना घडली होती.

गौरी गणपतीचा सण उरकून चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून अनेक प्रवासी वर्गाला खेड बाजू कडील कशेडी बोगदा मार्गवर प्रवासासाठी बंद असल्याने जुना मुंबई- गोवा मार्गवरील कशेडी घाट आहे. चढावा व पोलादपूर बाजूकडे येताना उतरवा लागत आहे. १० मिनिटात बोगदा पार होत असताना परतीच्या प्रवासाला जुन्या मार्गवरील ४५ मिनिटे जास्त लागत असूनव इंधन सुद्धा जास्त लागत आहे. अनेक चाकरमानी यांनी कशेडी बोगदा परतीच्या वाहनांसाठी सुरू करावा अशी मागणी करत आहेत, मात्र खेडकडू पोलादपूरकडे येणारा बोगदा ८० टक्के पूर्ण झाला असून या बोगद्यातून तूर्तास पोलादपूर कडून वाहने जात आहेत तर पोलादपूरकडून खेडकडे जाणारा बोगदा अपूर्ण असल्याने महामार्ग विभाग व ठेकेदार यांन लवकरात लवकर बोगद्याच्या काम रस्त्याची कामे पूर्ण करत वाहनांसाठी खुल करावा अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular