आपण साफ केलेली गाडी जर त्याला वरती कव्हर न करता बाहेर ठेवली गेली तर त्याच्यावर लगेच धूळ जमा होते जणू बरीच वर्षे आपण त्या गाडीची साफ-सफाईचं केली नाही. पण भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात धूळ का जमा होते ते आज आपण पाहणार आहोत. भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात धूळ जमा होण्याचं बरीच कारणे आहेत पण 90 टक्के कारण हे आपल्या इकडचं वातावरण आहे.
तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये किंवा साऊथ इस्ट देशांमध्ये मान्सूनचा प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे अर्थात मुसळधार पावसाळा तुम्हाला भारतामध्ये पाहायला मिळतो, बाहेरच्या देशात सुद्धा पाऊस येतो पण ज्या प्रकारे सलग महिन्यांमध्ये जसा भारतामध्ये पाऊस पडतो तसा तिथे पाहायला मिळत नाही म्हणजेच वर्षांमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात पाऊस हा त्या देशांमध्ये येत असतो. पण अगदी उलट पाहायला गेलं तर भारतामध्ये जून ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये पावसाळा हा पाहायला मिळतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे मान्सूनचे ढग जे बंगालच्या उपसागरावरून आणि हिंदी महासागरावरून आपल्या भारतामध्ये येतात हे सर्व हे सर्व ढग हिमालयामुळे आणि पश्चिम घाटामध्ये असलेल्या डोंगरामुळे अडवले जातात आणि सलग पाऊस आपल्याला भारतामध्ये त्यामुळेच पहायला भेटतो.
हा वातावरणातला बदल वर्षातून दोनदा होतो म्हणजेच पावसामध्ये जमीन ही आपली ओली असते आणि उन्हाळ्यामध्ये ही जमीन पूर्णपणे सुकी असते. हेच चक्र हजारो वर्षापासून चालत आले आहे त्यामुळे आपल्या जमिनी मधील माती ती घट्ट राहत नाही कारण दर पावसामध्ये नवीन झाडे उगवतात किव्हा लावली जातात आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण शोधण्यासाठी त्यांची मुळं ही जमिनीच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच मुळे आपली मातीची आहे घट्ट राहत नाही. पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पूर्वेकडून वारे वाहण्यास सुरुवात होतात त्यावेळेला ह्यास माती पासून झालेली धूळ हवेमध्ये पसरण्यास सुरुवात होते बाहेरच्या देशांमध्ये अशा प्रकारचा हंगामी पाऊस नसल्याकारणाने जमिनीमधील ओलसरपणा हा वर्षभर टिकून राहतो आणि त्यामुळे तेथील माती ही घट्ट राहते आणि हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे त्या देशांमध्ये जास्ती धूळ पाहावयास मिळत नाही तीच माती भारतामध्ये पावसाळी हंगामात चिखल स्वरूपात पहायला मिळते तर उन्हाळ्यामध्ये त्याचे धुळी मध्ये रूपांतर होते. भारता मधलं वातावरण ज्याने आपल्या येथे अशा प्रकारची धूळ पाहायला भेटते.
याशिवाय शहरी पट्ट्यामध्ये देखील आपल्याला जास्त प्रमाणात धूळ पाहायला भेटते त्याला कारण आहे शहरांमध्ये चालू असलेले कंस्ट्रक्शन वर्क किंवा इंडस्ट्रियल पॉल्युशन याच कारणामुळे धुळीचे प्रमाण हे वाढले जाते. याव्यतिरिक्त शहरी पट्ट्यामध्ये वाहनांचे प्रमाण हे जास्त असल्याने आणि त्याची सलग रहदारी असल्याकारणाने ही साचलेली धूळ वातावरणामध्ये पसरली जाते. यावर पर्याय म्हणजे जास्त प्रमाणात झाडांचे लागवड केली पाहिजे आणि निसर्गाला वाचवून निसर्गाचा समतोल आपण राखला गेला पाहिजे.