28 C
Ratnagiri
Wednesday, April 17, 2024

आनंदाची बातमी! यंदा पाऊस १०६ टक्के बरसणार

एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून...

कोरे प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यांत...

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून थेट गुन्हाच दाखल

खेड शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे....
HomeDapoliसायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती

सायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती

सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरू झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला.

कोकणामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणपती आणि होळी. दोन्हीही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरू होते. वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करत लोकं गावी पोहोचतात. पण दापोली सायकलिंग क्लबचे अजय मोरे आणि सूरज भुवड यांनी मुंबईतील अंधेरी ते दापोली असा २५० किमीचा प्रवास करण्यासाठी सायकलची निवड केली. या सायकल प्रवासात त्यांनी पर्यावरणपूरक गणपती उत्सव याबद्दल जनजागृती केली.

जनजागृतीसाठी अंधेरी ते दापोली असा २५० किमीचा या दोघांनी सायकल प्रवास केला. नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला असलेल्या अजय मोरे आणि सूरज भुवड यांचे गाव दापोली तालुक्यातील लाडघर व आंबवली आहे. हा २५० किमीचा सायकल प्रवास त्यांनी बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ ला एका दिवसात पूर्ण केला. अंधेरी, पनवेल, खोपोली, पाली, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा त्यांचा मार्ग होता. सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरू झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला.

या सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पा गोष्टी झाल्या. पर्यावरण पूरक गणपती उत्सव हा संदेश घेऊन निघालेल्या त्यांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे सर्व क्षीण काही क्षणातच नाहीसा झाला आणि अजून स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.

गणपती बाप्पाची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी आणि सुखरुप झाला, असे त्यांचे मत आहे. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी रोजच सायकल चालवावी,  असे त्यांनी आवाहन केले आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात अजय आणि सूरज सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. ऑफिस आणि बाजारात जाण्यासाठी ते अनेक वेळा सायकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनले आहे. अनेक वर्षांपासून ते आजारी पडले नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular