26.2 C
Ratnagiri
Saturday, September 23, 2023
HomeRatnagiriशेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज - आमदार निकम

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज – आमदार निकम

किमान चारपट दर आकारून जिल्ह्यातील कोकणातील बागायतदारांची महावितरण पिळवणूक करत होते.

उर्वरित महाराष्ट्रातील बागायतदारांना झुकते माप देऊन कोकणातील बागायतदारांची लूट करणाऱ्या महावितरणला आमदार शेखर निकम यांनी अखेर जागे केले. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याचा आदेश जारी झाला आहे. महावितरणच्या जाचक वसुलीतून येथील बागायतदारांची मुक्तता होणार आहे. आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून वीजबिल आकारणीची मागणी आमदार निकम यांनी केली आहे राज्यातील शेतकरी, बागायतदारांना शासनाने सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला. कृषिपंपाचे वीजबिल संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच हवे होते; मात्र महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने राज्याच्या अन्य भागात वेगळा दर आणि कोकण खासकरून रत्नागिरी येथील बागायतदार शेतकन्यांना वेगळा दर ठेवला होता.

किमान चारपट दर आकारून जिल्ह्यातील कोकणातील बागायतदारांची महावितरण पिळवणूक करत होते. महावितरणचा हा दुजाभाव आमदार निकम यांनी उघड केला. उर्वरित महाराष्ट्रात संत्री, द्राक्ष, केळी, ऊस, आदी फळपिकांच्या बागायतदार शेतकऱ्यांवर महावितरणचा सवलतीचा दर, मात्र कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू त्याचबरोबर फूलशेती यांना मात्र कोणतीही सवलत मिळत नव्हती. उर्वरित महाराष्ट्रातील बागायतदारांना सवलत आणि रत्नागिरीतील शेतकऱ्यांना जादा दराने वीजपुरवठा सुरू होता. यावरून आमदार निकम यांनी अभ्यासपूर्ण माहिती मांडत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवला.

तत्कालीन विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणचे एमडी विजय सिंघल यांना या संदर्भात जाब विचारला. निकम यांनी कोकणातील बागायतदारांची बाजू अनेक ठिकाणी ठामपणे मांडली. आमदार निकम यांनी प्रशासन, महावितरण यांना कोकणातील दर उर्वरित महाराष्ट्रातील बागायतदारांना लावा, अशी मागणी करून कोंडीत पकडले होते. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रामध्ये असणारा दर कोकणातील बागायतदारांना लावण्यात आला.

आदेश पारित झाल्यापासून आकारणी – आमदार निकम यांनी कृषिपंपाला पुरवठा करण्यात येणाऱ्या वीजबिलात तफावत आणि कोकणावर होणार अन्याय या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आली. त्यानुसार उर्वरित महाराष्ट्रातील बागायतदारांप्रमाणे असणारा वीजदर आकारणी करण्याचे आदेश शासनाने पारित केले आहेत. कोकणातील बागायतदारांची पुन्हा लूट होऊ नये यासाठी महावितरण आणि ऊर्जा विभाग यांच्याकडे पुन्हा मागणी करताना शासन आदेश पारित झाल्यापासून वीजदर आकारणी करण्याची मागणी आमदार निकम यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular