26.4 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeKhedखेडमध्ये लाखो रुपयांची वीजचोरी गुन्हा दाखल

खेडमध्ये लाखो रुपयांची वीजचोरी गुन्हा दाखल

१३ लाख ३४ हजार ३९० रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केले.

गेल्या १५ महिन्यांपासून वीजचोरी करून ७६ हजार ९३ युनिट्सचा वापर करत महावितरणची १३ लाख ३४ हजार ३९० रुपयांची वीजचोरी केल्याच्या आरोपाखाली खेड तालुक्यातील तळघर येथील रामचंद्र भागोजी बुदार व राकेश रामचंद्र बुदार यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा २००३ अधिनियमचे कलम १३५ नुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात महावितरणचे भरारी पथक पेण येथील उपकार्यकारी अभियंता विजय राजेश धरमसारे यांनी तक्रार दिली असून तक्रारीत म्हटल्या प्रमाणे दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली.

लोटे एमआयडीसी उपविभाग रत्नागिरी जिल्हा यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खेड तालुक्यातील तळघर या परिसरातील विजचोरी शोधून काढण्यासाठी कार्यरत होते. विजय धरमसारे तसेच सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम, सहाय्यक व अधिकारी शशीकुमार तांबे, वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील, यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र भागोजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार यांचा ग्राहक क्रमांक २२२३६०००.२०५८ या चिरेखाणीला वीजपुरवठा असलेल्या विज संचाची तपासणी केली. यामध्ये या मीटरमधून वापरत असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी सदर वीज मीटर हाताळलेला पाहायला मिळाला या मीटरच्या टर्मिनलचे स्क्रू ढिले करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले व पल्स बंद करत असल्याचे आढळून आले.

जेणेकरून वीज वापराची नोंद वीजमीटरमध्ये नोंद होणार नाही अशा प्रकारे वीज मीटर मध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले. अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्या विजग्राहक रामचंद्र बाबूजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार त्याच्या वीज मीटरच्या साह्याने वीज चोरी करत होते ते वीज मीटर पंचांच्या समक्ष सील करून ताब्यात घेतले गेले. अनधिकृतपणे विजेचा वापर गेल्या १५ महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत झाला असून ७६ हजार ९३ युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे.

तब्बल १३ लाख ३४ हजार ३९० रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केले म्हणून वीज अधिनियम कायदा २००३ सुधारित कायदा २००७ चे कलम १३५ अन्वये रामचंद्र भागोजी बुदार व राकेश रामचंद्र बुदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास निकम करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular