25 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriजुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचान्यांचा 'एल्गार'

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचान्यांचा ‘एल्गार’

विविध मागण्या घेऊन सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पुन्हा एकदा शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना क्रांतीदिनी रस्त्यावर उतरणार असून ९ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रांतीदिनी ९ ऑगस्ट रोजी भव्य बाईक रॅली काढून शासनाच्या धोरणांचा निषेध करणार आहेत.

कर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध – देशभरात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने होत असताना जिल्ह्यामध्ये देखील शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. पी. एफ. आर. डी. ए. कायदा रद्द व्हावा, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, कामगार विरोधी सर्व कायदे रद्द करावेत, सर्व आस्थापनांमध्ये कंत्राटीकरण रद्द करावे तसेच तेथे नियमित भरती करावी त्याचप्रमाणे किमान वेतन हे २८ हजार रुपये करण्यात यावे, अशा विविध मागण्या घेऊन सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.

बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हा – लढणारे लढू देत आम्हाला फायदा मिळेल तेव्हा बघू असे न म्हणता आपली नैतिक जबाबदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती कामगार संघटनेच्या समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे. यावेळी जुनी पेन्शन योजनेचा, छाप असलेली पांढरी टोपी, सफेद शर्ट किंवा टी-शर्ट तसेच काळी पॅन्ट व भगिनींसाठी पांढरी साडी असा गणवेश निर्धारित करण्यात आला आहे. रॅलीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सामाजिक न्याय भवन कुवारबाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी समन्वय समितीच्या अध्यक्ष व सचिवांकडून करण्यात आले आहे.

शासनाला भाग पाडू ही बाईक रॅली सामाजिक न्याय भवन ते रत्नागिरी जयस्तंभपर्यंत निघणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मागील आंदोलनात मध्यवर्ती कामगार संघटनेच्या संपाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे शासनाला समिती स्थापन करावी लागली होती. यापुढे शासनाला जुनी पेन्शन देण्यास भाग पाडू, असा इशारा मध्यवर्ती संघटनेने दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular