26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeDapoliप्रस्तावित ८४ लघुउद्योगतून रोजगारनिर्मिती सोवेली औद्योगिक वसाहत

प्रस्तावित ८४ लघुउद्योगतून रोजगारनिर्मिती सोवेली औद्योगिक वसाहत

रोजगार निर्माण होणार असून, बेरोजगारांना काम मिळणार आहे.

मंडणगड तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, स्वयंरोजगारातून सर्वांगीण आर्थिक हित साध्य व्हावे, या उद्देशाने शिरगाव येथे कार्यरत झालेल्या सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीत ८४ लघुउद्योग प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यातील दोन उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. उद्योगनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यमान अध्यक्ष रमेश दळवी यांनी इलेक्टिक व्हेईकल चार्जरचा व्यवसाय येथे सुरू केला आहे. विकास एंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून संस्थेचे उपाध्यक्ष विकास शेट्ये यांनी पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर आणि कोल्ड्रिंक्सचा दुसरा व्यवसाय नुकताच सुरू केला आहे. या दोन्ही व्यवसायात प्रत्यक्षपणे दहा व अप्रत्यक्षपणे शंभर बेरोजगार तरुणांच्या हातास काम मिळाले आहे.

आता एमडीज् १० कंपनीचे कोकण मॅजेस्टिक नावाने थ्री स्टार रेटिंग असलेले हॉटेल, विप्रो अॅग्रो कंपनीमार्फत पनीर बनवण्याचा कारखाना, सागर एंटरप्रायजेस यांच्यामार्फत लसूण पेस्ट बनवण्याचा कारखाना लवकरच सुरू होणार आहे. दीपक प्लास्टिकजे दत्त आणि कंपनी यांच्यामार्फत पुढील तीन महिन्यात स्टेशनर उत्पादन व प्लास्टिक वस्तू बनवण्याचा कारखाना सुरू होईल. सॅनिटरी वेअर तसेच एचडीपी पाईप बनवण्याचे आणि परदेशातून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये लागवून विकणे असे दोन मोठे उद्योगही सुरू होणार आहेत. या सर्व उद्योगांमधून तालुक्यातील सुमारे १ हजार प्रत्यक्ष तर ५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून, बेरोजगारांना काम मिळणार आहे. वसाहतीमधील उद्योगांच्या माध्यमातून वर्षाला तीनशे ते चारशे कोटी रुपयेइतकी उलाढाल अपेक्षित आहे.

औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी २ कोटी १८ लाखांचा प्रस्ताव शासनाने नुकताच स्वीकारल्याचे दळवी यांनी सांगितले. विविध प्रकारच्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा संस्थेचा उद्देश असल्याने मोठा प्रकल्प वा एका उद्योगाला देण्यात आलेले नाही. एखादा मोठा उद्योजक या ठिकाणी येऊन मोठा उद्योग उभारू शकतो; मात्र त्यामुळे स्थानिक उद्योजकांना संधी मिळणार नाही, ही महत्वाची बाब लक्षात घेऊन संस्थेचे चेअरमन रमेश दळवी हे संस्थेच्या मूळ उद्देशाप्रती कार्यरत राहिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular