27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...
HomeRatnagiriऐन दिवाळीत ठाकरे गटाला धक्का महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

ऐन दिवाळीत ठाकरे गटाला धक्का महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

या प्रवेशामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

ऐन दिवाळीत रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का मिळाला आहे. महिला आघाडीच्या नेत्या संध्या कोसुमकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक महिलांनी शुक्रवारी पाली (रत्नागिरी) येथे उबाठाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री ना. उदय सामंत याच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत या सर्वांचे शिवसेनच्या शिंदे गटात स्वागत करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने आपण शिंदे गटात प्रवेश करत आहोत असे सांगितले. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये ठाकरे गटाच्या रत्नागिरी उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुमकर, विभाग प्रमुख गीता शिंदे यांच्यासह अनेक महिलांचा समावेश आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी या महिलांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेना महिलांना सन्मान देते आणि त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देते. शिवसेना ही महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवा, शिवसेना आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल असे उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले.

शेकडो महिलांचा प्रवेश – पालीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुमकर, विभाग प्रमुख गीता शिंदे यांच्यासह शुभांगी जोशी, शिल्पा दुडे, प्रतिभा उतेकर, शलाका मांडवकर, रुचिता ढेपसे, रोहिणी नलावडे, श्रद्धा झगडे, रुपाली धामणस्कर, राजश्री सावंत, श्वेता फाळकें, दीपाली जाधव, धनश्री कुष्टे, संस्कृती नागवेकर, संचिता कदम, आरती सावंत, शुभांगी पवार, वैशाली वालम, मुमताज मस्कर, आसिया साखरकर, हनिफा मिरकर, आरिफा पावसकर, जुबेदा बुडिए, साखिफ पावसकर, रुक्साना चाहूस, रेश्मा बोरनकर, रिया कोसुमकर, प्रियांका कोसुमकर, प्रियांका फडतडे, आरोही पवार, फातिमा मिरकर, हालिमा मस्तान, नसीमा मस्तान, बक्षूनिसा बुडिए, निलीफर फणसोपकर, मिसबा ‘उतेकर, पर्विणा दरवेश, तस्सिया मुस्कान मस्कर, सोना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular