25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeMaharashtraमुंबईत झिका व्हायरसची एन्ट्री - राज्यांना अलर्ट

मुंबईत झिका व्हायरसची एन्ट्री – राज्यांना अलर्ट

झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांपासून स्वतःचे संरक्षण करणं हा आहे.

देशभरात कोरोना व्हायररसचा प्रसार आटोक्यात आला आहे. एखाद-दुसरं प्रकरण समोर येत असतानाच आता एका जुन्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्व राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतल्या चेंबूर भागात झीका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. या आजारात ताप येण्याबरोबरच अंगावर लाल चट्टे उठतात. याशिवाय डोकेदुखी, डोळे लाल होणं अशी लक्षणंही दिसून येतात. काही वेळा एका आठवडयाहून अधिक काळ ही लक्षणं दिसून येतात. मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहाणाऱ्या एका व्यक्तीला झीका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

उपचारानंतर या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आरोग्यविभागाने दिली आहे. पण या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. हा व्हायरस पसरू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, दिल्लीसह सर्व राज्यांना अलर्ट जारी केलं आहे. झिका विषाणू प्रामुख्याने एडिस डास चावल्याने पसरतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चावण्याल्याने माणसाला याची लागण होते. या आजाराचा सर्वाधिक धोक हा गर्भवती महिलांना असतो. गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. झीका व्हायरस गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज आहे. यात रुग्णांना ताप येणं हे मुख्य लक्षण मानलं जातं.

पण औषधांमुळे हा आजार बरा होऊ शकतो. रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. पण झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांपासून स्वतःचे संरक्षण करणं हा आहे. १९४७ साली युगांडात या व्हायरसचा उगम झाल्याचं बोललं जातं. युगांडाच्या झिका जंगलात आढळून आलेला हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं. १९५२ साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.

RELATED ARTICLES

Most Popular