27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriआरेवारे किनाऱ्यावर शेकडो किलो संशयास्पद पदार्थ

आरेवारे किनाऱ्यावर शेकडो किलो संशयास्पद पदार्थ

आरेवारे समुद्र किनाऱ्यावरही अंमली पदार्थ सदृश्य चिकट असे पांढरे गोळे मोठ्या प्रमाणावर सापडले.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली समुद्र किनाऱ्यावर १४ ऑगस्टपासून सलग ३ ते ४ दिवस शेकडो किलो चरस या अंमली पदार्थाच्या बॅगा सापडल्या होत्या. या ठिकाणी पोलीस तसेच कस्टम विभाग कर्मचारी गस्त घालत असतानाच तीन दिवसांपूर्वी गुहागर तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवरही चरसचा साठा सापडला होता. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे समुद्र किनाऱ्यावरही अंमली पदार्थ सदृश्य चिकट असे पांढरे गोळे मोठ्या प्रमाणावर सापडले. यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. किनाऱ्यावर सापडलेले पांढरे गोळे म्हणजे नेमके काय आहे, हे कळत नसल्याने तसेच स्फोटकांसारखे काही पदार्थ असू शकतात या शक्यतेने पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत किनारपट्टीवर प्रवेश बंद केला.

डॉगस्कॉड बोलवण्यात आले. संपूर्ण किनारपट्टी पिंजून काढण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे २०० किलोच्यावर हे गोळे सापडण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र यात स्फोटके किंवा कोणतेही अन्य संशयास्पद वस्तू नसल्याचा निर्वाळा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. हे गोळे म्हणजे. नेमका कोणता पदार्थ आहे याचा शोध घेण्यासाठी त्याचे नमुने फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतरच हा पदार्थ नेमका काय आहे हे समजणार आहे. याआधी दापोली आणि गुहागर किनाऱ्यावर चरस सापडल्यानंतर रत्नागिरी आरेवारे किनाऱ्यावर सापडलेला पदार्थही चरस असण्याची शक्यता ग्राम स्थांकडून व्यक्त होत आहे. दोन आठवड्यात जिल्ह्यात तिसऱ्या किनाऱ्यावर अशा प्रकारे पदार्थ सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीसांनी संपूर्ण किनारपट्टीवर गस्त वाढवली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular