24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeEntertainmentकरीना आणि कोरोना ! थोडासा दिलासा

करीना आणि कोरोना ! थोडासा दिलासा

गेल्या आठवड्यात अभिनेत्री करीना कपूर आणि तिची जवळची मैत्रीण अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती. करण जोहरने ८ डिसेंबर रोजी त्याच्या घरी कभी खुशी कभी गम सिनेमाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डिनर पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये करीना, अमृता, महीप, सीमा सहभागी झाले होते. या दोघींनीही कोरोनाच्या नियमांचे पालन न करता बॉलिवूड पार्ट्यांना हजेरी लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी सुद्धा दोन लहान मुले घरात असून सुद्धा एवढे बिन्दास्त कसे राहू शकते? म्हणून करीनाला फटकारले होते.

सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर याही त्या पार्टीमध्ये सामील झाल्या होत्या. करीना आणि अमृता यांच्यानंतर त्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या सगळ्यांची ओमायक्रॉन चाचणीही करण्यात आली. पण या सगळ्यात आता करीनासाठी दिलासादायक बाब आहे. तिचा ओमायक्रॉन जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी या सगळ्यांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली होती. आज करीनाचा रिपोर्ट आला असता, तो निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच करीनाला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेली नाही. सध्या करीना तिचा होम क्वारंटाइनचा कालावधी संपण्याची वाट बघत आहे.

करीना कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण झाली असा आरोप तिच्यावर करण्यात आलेला. मात्र तिच्या टीमने याबाबत सविस्तर माहिती देत, करीनाची बाजू मांडली आहे. करीना कपूरच्या टीमकडून एक स्टेटमेंट प्रसिद्ध करण्यात आलेले. ‘करीनाने लॉकडाऊनच्या काळात एका जबाबदार नागरिकाप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडली आहे. जेव्हाही कधी ती घरातून बाहेर पडते, तेंव्हा कोरोना नियमांचे पालन करुनच आणि योग्य ती सर्व काळजी घेते. पण दुर्दैव म्हणजे यावेळी ती आणि अमृता अरोरा कोरोनाची शिकार बनल्या. ज्या पार्टीमध्ये करीना कपूरने हजेरी लावली होती त्यात एक व्यक्ती अगोदरच आजारी होती, तिला खोकल्याचा त्रास जाणवत होता आणि त्या व्यक्तीमुळेच सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते.

RELATED ARTICLES

Most Popular