रत्नागिरातील शेट्येनगरमध्ये जानेवारी महिन्यात पहाटे एका घरात झालेला भयानक स्फोट हा सिलेंडरमधून लिक झालेल्या गॅसमुळेच झाल्याचा अहवाल कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाने दिला आहे. या स्फोटाने ३ जणांचा बळी घेतला होता. कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाने या स्फोटाविषयीचा अंतिम अहवाल रत्नागिरी शहर पोलिसांना दिला आहे. अहवालामध्ये घटनास्थळावरून कोणतेही स्फोटक पदार्थांचे नमुने आढळून आले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी शेट्येनगर येथील ‘आशियाना’ इम रतीमध्ये ४ वाजून ५६ मिनिटांनी जोरदार स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटात इमारतीचा स्लॅब कोसळून खाली आला. तर किचन व हॉलसमोरील भिंतीच्या अक्षरक्ष: ठिकऱ्या उडाल्या होत्या. या स्फोटात फ्लॅटचे मालक अश्फाक अहमद काझी (५२) हे गंभीर जखमी झाले होते, त्यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची पत्नी कनिज अश्फाक काझी (४८, रा शेट्येनगर रत्नागिरी) व सासू नुरूनीसा अल्जी (७०, रा मजगांव रत्नागिरी), असा एकूण ३ जणांचा मृत्यू या दुर्घटनेत ओढवला तर अश्फाक यांचा मुलगा अमार अश्फाक काझी (२०, रा. शेट्येनगर मुळ रा सोमेश्वर रत्नागिरी) जखमी झाला होता.

रत्नागिरातील शेट्येनगरमध्ये जानेवारी महिन्यात पहाटे एका घरात झालेला भयानक स्फोट हा सिलेंडरमधून लिक झालेल्या गॅसमुळेच झाल्याचा अहवाल कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाने दिला आहे. या स्फोटाने ३ जणांचा बळी घेतला होता.कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाने या स्फोटाविषयीचा अंतिम अहवाल रत्नागिरी शहर पोलिसांना दिला आहे. अहवालामध्ये घटनास्थळावरून कोणतेही स्फोटक पदार्थांचे नमुने आढळून आले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.८ जानेवारी २०२३ रोजी शेट्येनगर येथील ‘आशियाना’ इम रतीमध्ये ४ वाजून ५६ मिनिटांनी जोरदार स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटात इम ारतीचा स्लॅब कोसळून खाली आला. तर किचन व हॉलसमोरील भिंतीच्या अक्षरक्ष: ठिकऱ्या उडाल्या होत्या. या स्फोटात फ्लॅटचे मालक अश्फाक अहमद काझी (५२) हे गंभीर जखमी झाले होते, त्यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची पत्नी कनिज अश्फाक काझी (४८, रा शेट्येनगर रत्नागिरी) व सासू नुरूनीसा अल्जी (७०, रा मजगांव रत्नागिरी), असा एकूण ३ जणांचा मृत्यू या दुर्घटनेत ओढवला तर अश्फाक यांचा मुलगा अमार अश्फाक काझी (२०, रा. शेट्येनगर मुळ रा सोमेश्वर रत्नागिरी) जखमी झाला होता.