26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriमानसिक आजारमुक्तांची सोय, चार जिल्ह्यांत १६ पुनर्वसन गृह

मानसिक आजारमुक्तांची सोय, चार जिल्ह्यांत १६ पुनर्वसन गृह

मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी ४ जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांमार्फत १६ पुनर्वसन गृह स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पहिल्या टप्प्यात रत्नागिरीसह नागपूर, पुणे, ठाणे या ठिकाणी ही पुनवर्सन गृह स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी ७६ लाखाची आर्थिक तरतुदीसही मान्यता देण्यात आली.

राज्यातील या ४ जिल्ह्यांतील पुनर्वसन गृहांमध्ये १८ ते ५५ वयोगटातील तसेच ५५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १६ पुनर्वसन गृहे सुरू करण्यात येणार आहे. या गृहांच्या खर्चापोटी ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतुदीसदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच पुढील टप्प्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तींची संख्या वाढल्यास ती विचारात घेऊन आवश्यकतेनुसार पुनर्वसन गृहांच्या संख्येत वेळोवेळी वाढ करण्याच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली.

मानसिक आजारमुक्त व्यक्तींना पुढील उपचाराची गरज नसते किंवा ज्या मानसिकमुक्त व्यक्ती बेघर आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय स्वीकारत नाहीत अशांसाठी ही पुनर्वसन गृहे असतील. पुनर्वसन गृहाने प्रवेश देण्यात आलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन, क्रीडा व मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी घ्यावयाची आहे.

RELATED ARTICLES

Most Popular