29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeEntertainmentप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बुधवारी खालावली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचे जवळचे मित्र मकबूल निसार यांनी कॉमेडियनला हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली आहे.

मकबूल निसार यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव सकाळी हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. यानंतर राजूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते म्हणाले की, राजू श्रीवास्तव पक्षातील काही बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. राजू यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मकबूल निसार पुढे म्हणाले, “राजूची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या तब्येतीची माहिती लवकरच दिली जाईल. डॉक्टरांच्या टीमने राजूचे पूर्वीचे वैद्यकीय अहवाल मागवले आहेत, त्याआधारे डॉक्टर त्याच्या बायपास सर्जरीचा निर्णय घेतील. मात्र , राजू तो सतत तंदुरुस्त आणि ठीक आहे. तो नियमितपणे जिम करत आहे. त्याच्या पुढे अनेक शहरांमध्ये त्याचे शो लाइन-अप आहेत. ३१ जुलैपर्यंत तो सतत शो करत होता.”

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या दमदार कॉमेडीसाठी ओळखले जातात. त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. राजू वर्षानुवर्षे आपल्या कॉमेडीने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. राजूला लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं आणि त्याचं स्वप्नही त्याने पूर्ण केलं. स्टेज परफॉर्मर म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली.

RELATED ARTICLES

Most Popular