29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeKhedखेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

या अपघातात दुसरा मुलगा गंभीरित्या जखमी झाला आहे.

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकी भरणे पुलावर आदळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातच या मुलाचा मृत्यू झाला आहे. स्वरूप संदीप’ सागवेकर (वय वर्षे १७ राहणार समर्थकृपा बिल्डिंग, वेरळ, ता. खेड) असं या अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या अपघातात दुसरा मुलगा गंभीरित्या जखमी झाला आहे. त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आला आहे. यथार्थ सकपाळ (वय वर्षे या १६, रा. बिजघर, ता. खेड ) असे जखमी झालेल्या मुलाचे नाक आहे. त्याच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

स्वरूप सागवेकर हा खेड येथील समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी होता. यावर्षी तो १० वी पास होऊन इयत्ता ११वीमध्ये इंग्लिश मीडियमला प्रवेश घेतला होता. स्वरूप हा उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता. तो व्यायामासाठी जात असताना दुर्दैवीरीत्या हा अपघात झाला आहे. स्वरूप याच्या मृत्यूने सागवेकर कुटुंबीयांवरती मोठा दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. स्वरूप याच्या पश्चात आई-वडील एक लहान भाऊ, आजी असे कुटुंब आहे. त्याच्या वडिलांचे खेड शहरातील श्री पाथरजाई मंदिराजवळ दुकान आहे. हे कुटुंब खेड तालुक्यातील सुकीवली येथील आहे. स्वरूपाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात व तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वरूप याला दहावीलाही चांगले मार्क पडले होते तो अभ्यासातही हुशार होता. पोलिसांत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular