26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriक्रेडाईच्या वास्तूरंग प्रदर्शनाचे उद्घाटन, रत्नागिरीत सुरु झाला घरांचा उत्सव

क्रेडाईच्या वास्तूरंग प्रदर्शनाचे उद्घाटन, रत्नागिरीत सुरु झाला घरांचा उत्सव

२२ डिसेंबरपासून सुरु झालेले हे गृहविषयक प्रदर्शन २५ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

रत्नागिरीत ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या ‘वास्तूरंग’ या गृहविषयक प्रदर्शनाचा थाटामाटात शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण तथा भैय्या सामंत आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी सुरु झालेले हे वास्तूरंग प्रदर्शन म्हणजे घरांचा सर्वात मोठा उत्सव मानला जात असून नागरिकांना त्यांच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी जे काही लागेल त्या सर्वांची इत्यंभूत माहिती या वास्तूरंग प्रदर्शनामध्ये मिळणार आहे. घर आणि बरंच काही या प्रदर्शनाच्या माध्यमातून, नागरिकांना जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

२२ डिसेंबरपासून सुरु झालेले हे गृहविषयक प्रदर्शन २५ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. रत्नागिरीतील साळवीस्टॉप परिसरात जलतरण तलावाजवळ हे भव्यदिव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाला उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख धनंजय कुलकर्णी, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी कितीकरण पुजार, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर विकास त्रिपाठी, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, नगररचना विभागाचे संचालक संभाजी मोरे, रत्नागिरी न.प.चे मुख्याधिकारी तुषार बाबर आदी दिग्गजांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे भव्यदिव्य प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अशा क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद भुते, उपाध्यक्ष महेश गुंदेजा, उपाध्यक्ष समीर सावंत, सेक्रेटरी सुमित ओसवाल आणि खजिनदार महावीर जैन यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन. क्रेडाईच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular