26.4 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriअखेर मॉन्सून उद्या रत्नागिरीत दाखल होण्याची शक्यता

अखेर मॉन्सून उद्या रत्नागिरीत दाखल होण्याची शक्यता

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे. गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाटकमधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनने गुरुवारी (ता. ८) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली. शनिवारी (ता.१०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळाची तीव्रता कायम अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. शनिवारी (ता. १०) ही प्रणाली गोव्यापासून ७०० किलोमीटर वायव्येकडे, मुंबईपासून ६२० किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होती. ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली आजपासून काहीशी वायव्येकडे वळण्याचे संकेत आहेत. वादळामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular