20.5 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeInternationalविल स्मिथने अखेर मागितली “त्या” होस्टची माफी

विल स्मिथने अखेर मागितली “त्या” होस्टची माफी

होस्ट रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना विल स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची तिच्या विरळ केसावरून मस्करी केली

सोमवारी लॉस एंजिलिसस्थित डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. संपूर्ण जगाचे ऑस्कर सोहळ्याकडे लक्ष लागून असते,  मात्र यंदा या सोहळ्याला काहीसे गालबोट लागले. किंग रिचर्ड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर लावली. होस्ट रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना विल स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची तिच्या विरळ केसावरून मस्करी केली. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला, अशी कमेंट रॉकने केली. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने स्टेजवर जाऊन होस्ट असलेल्या रॉकच्या थोबाडीत मारली.

घडल्या प्रकारानंतर सुरुवातीला सगळ्यांना हा विनोदाचा काही भाग असेल असे वाटले होते. पण नंतर जे व्हिडिओ समोर आले, त्यामध्ये विल स्मिथ रडताना दिसला होता. त्यानंतर हा विनोद नसल्याचे सगळ्यांना स्पष्ट झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत होस्ट रॉकची जाहीर माफी मागितली आहे. मी माझी हद्द ओलांडली, मी चुकीचा वागलो, असे त्याने म्हटले आहे.

त्यानंतर इंस्टा वर त्याने ख्रिस या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा वागलो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती अयोग्य असून, मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी हे योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगामध्ये हिंसेला अजिबात स्थान नाही. विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

विलने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले कि, माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग झाला, पण पत्नी जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले. माझ्या या कृत्यामुळे कार्यक्रमाला सुद्धा गालबोट लागल्याने मी सर्वांची जाहीरपणे माफी मागतो.

RELATED ARTICLES

Most Popular