27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRajapurफायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून एकाचे टोकाचे पाऊल

फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून एकाचे टोकाचे पाऊल

फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ अजीम नाईक याने जेसीबी छोला मंडळ या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते

राजापूर तालुक्यातील हसोळ सौंदळ येथिल अजीम कादर नाईक याने जेसीबी छोला मंडल या फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सतत तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने गवत मारण्याचे औषध प्यायल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला आहे. याबाबत त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीमध्ये दिनेश बाबर,  अनिरूद्ध माने व अजून एक अशा एकूण तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत राजापूर पोलीस स्थानकात रियाज नाईक यांनी फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ अजीम नाईक याने जेसीबी छोला मंडळ या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे तीन हप्ते शिल्लक राहिले होते. परंतु, तीन हप्ते भरण्याबाबत कोणतीही कायदेशीर नोटीस न देता किंवा कोणत्याही कायदेशीर मार्ग न अवलंबता हवे तसे उलट सुलट बोलून माझ्या भावाला मानसिक त्रास देऊन, हप्त्याची रक्कम तातडीने भरण्याकरिता जबरदस्ती करून चोलामंडल कंपनीचे अधिकारी यांनी त्याला तत्काळ हप्ते भरण्याबाबत तगादा लावल्याने त्याने सततच्या त्रासाला कंटाळून, गवत मारण्याचे औषध पिऊन आपले जीवन संपविले.

आधीचे सर्व हफ्ते वेळेवर भरले गेले असतानासुद्धा विनाकारण त्रास देण्याच्या हेतूनेच या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाठीशी सततचा तगादा लावल्याने त्याने कंटाळून हे टोकाचे पूल उचलले असल्याचे त्याच्या तक्रारदार भावाने सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांबद्दल तातडीने कारवाई करण्यात यावी. सदर कंपनीला देखील या संदर्भात कल्पना देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular