ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे घर बांधण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या नागरिकांकडे स्वतः ची जमीन नाही, त्यांना घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असं नाव देण्यात आलं आहे. घरकुल या योजनेअंतर्गत बांधण्यासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून, मदत दिली जाईल. ५०० चौरस फुट भूखंड खरेदीसाठी एक लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे. जर जमिनीची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर नागरिकांना पूर्ण रक्कम मिळेल. मात्र किंमत जास्त असल्यास केवळ एक लाख रुपयांपर्यंतच आर्थिक सहाय्य दिलं जाईल. यामुळे घरकुल योजनेत सामील होणाऱ्यांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं सोपं होणार आहे. विविध घरकुल योजनांतील लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ही योजना स्वतंत्र नसून इतर घरकुल योजनांशी जोडलेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि मोदी आवास ‘घरकुल योजना या सर्व योजनांतील लाभार्थ्यांना या नव्या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. म्हणजेच, आधीपासूनच घरकुल योजनांसाठी पात्र असलेल्या नागरिकांना आता जमीन खरेदीसाठीही आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठी २० टक्के अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल. मात्र या अतिरिक्त जमिनीची म ालकी ग्रामपंचायतीकडे राहणार आहे. या निर्णयामुळे कमी जागेत अधिक घरे उभी करता येतील आणि सुसज्ज वसाहती उभारता येतील. सरकारवा हा निर्णय ग्रामीण भागातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांना आता ते प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. ‘सर्वांसाठी घरे’ हे सरकारचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल.