विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रते बाबत निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून निकाल काहीही लागो…, आमची निष्ठा मातोश्री आणि ठाकरेंशी आहे. आणि शिवसेना देखील ठाकरे घरण्याचीच होती आणि राहील. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत शिवसैनिक पदाधिकारी आपल्या मतावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.तर शहरातील वडनाका शाखेने या संदर्भात लावलेला एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा फिक्सिंगचा भाग आहे. लोकांची दिशाभूल करून राज्य चालवण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. भारतीय संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे. याचे परिणाम सर्वत्र उमटतील.
विधानसभा अध्यक्षाकडून असाच निकाल अपेक्षित होता. परंतु हा निकाल न्यायाला मान्य नाही. सर्वोच्च न्यायालय योग्य तो न्याय निवडा करेल, आम्हाला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी म्हंटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल अत्यंत क्लेशदायक आणि विश्वास न बसणारा निकाल आहे. २०१८ ची पक्ष घटना अमान्य पण २०१९ ला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलेली उमेदवारी एबी फॉर्म मान्य हा कोणता न्याय आहे? एकनाथ शिंदे भाजपला हाताशी धरून जे काही करत आहेत त्याचे परिणाम त्यांना भविष्यात दिसून येतील. कोणी कितीही अपटू दे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच होती आणि राहील आणि आमची निष्ठा मातोश्री व ठाकरे घराण्याशी कायम असेल.
आम्ही संघर्षसाठी तयार असून भविष्यात पूर्ण ताकदीने लढा देऊ अशी स्पष्ट प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी दिली आहे. हिंमत असेल तर निवडणुका घ्या क्षेत्रप्रमुख बाळा कदम अनेक पक्ष फिरून आलेल्या कडून न्यायाची अपेक्षा काय करायची.? त्यांच्याकडून हा निकाल अपेक्षितच होता. शिवसेनेवर अनेक आक्रमणे झाली, संकटे आली. परंतु शिवसेना आणि मातोश्री कायम आहे. यापुढे देखील ते कायम राहील. सर्व काही त्यांच्या बाजूने होत आहे मग निवडणुका घ्यायला का घाबरतात? हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. जनता चोख उत्तर देईल. आणि ठाकरेंचा शिवसैनिक तर सज्ज झाला आहे.
या एकदा मैदानात, होऊन जाऊदे समोरा समोर असे थेट आव्हानच ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी दिले आहे. शहरातील फलक लक्षवेधी दरम्यान शहरातील वडनाका येथील शिवसेना शाखेच्या वतीने एक फलक लावण्यात आला आहे. त्यावर शिवसैनिक गरीब आहे… लाचार नाही… स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. कितीही विकले जाऊदे, आम्हाला जमणार नाही आशा – अश्यायाचा मजकूर लिहण्यात आला असून हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकजण त्या फलकाचे फोटो काढत असून काहीजण त्या फलकाबरोबर सेल्फी घेताना देखीन्न दिसत आहेत.