33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriमांडवी बंदरातील गाळासाठी मच्छीमार एकत्र

मांडवी बंदरातील गाळासाठी मच्छीमार एकत्र

भाट्ये खाडी परिसरातील राजिवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आणि इतर गावांमध्ये मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. 

भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत आंदोलनाला जुना फणसोप येथे मच्छीमार आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. मच्छीमारांच्या हितासाठी संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न चर्चेत आहे. जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने जुना फणसोप येथे आयोजित सभेला मच्छीमार आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भाट्ये खाडी परिसरातील राजिवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आणि इतर गावांमध्ये मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे.  भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळामुळे येथील मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छीमार संघर्ष समिती गाळाची समस्या शासनदरबारी मांडत आहे. मांडवी बंदरातून मासेमारीसाठी समुद्राला ये-जा करण्याचा एकमेव मार्ग आहे. गाळामुळे हा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर हा प्रश्न मच्छीमार संषर्घ समितीने हाती घेतला आहे.

मच्छीमार संघर्ष समितीने मच्छीमारांना बरोबर घेऊन २६ जानेवारीला बेमुदत उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी राजिवडा, कर्ला, फणसोप, भाट्ये येथे मच्छीमारांच्या सभा घेण्यात येत आहेत. जुना फणसोप येथे मच्छीमार आणि ग्रामस्थांची सभा झाली. मच्छीमारांच्या हितासाठी मच्छीमार संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला. सभेला कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष दरबार वाडकर, जाविद होडेकर, इमरान सोलकर आदींनी विचार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular