25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजागेअभावी पाच पाणीयोजना ठप्प - जलजीवन मिशन

जागेअभावी पाच पाणीयोजना ठप्प – जलजीवन मिशन

११२ कोटी ५९ लाखांची ही योजना असून, ती ३५ गावांसाठी आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्या १२ पाणीयोजना राबवण्यात येत आहेत. ४१० कोटी ५८ लाखांच्या या योजना असून त्याला २९१ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या वर्षाच्या सुरवातीला योजनांना कार्यारंभ आदेश दिला आहे. योजनांचे काम सुरू झाले आहे; परंतु ५ योजनांना पुढील कामासाठी खासगी जागा मिळत नसल्याचे कामे ठप्प झाली आहेत. बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनांचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी शासनाच्या जलजीव मिशन योजनेअंतर्गत पाणीयोजना राबवण्यात आल्या. हर घर नलसे जल, असे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे. जिल्ह्यात १२ योजना मंजूर झाल्या असून, बहुतेक योजनेला जानेवारी, फेब्रुवारी २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश दिला आहे.

जयगड प्रादेशिक पाणीयोजना, मिऱ्या-शिरगाव- निवळी तिठा व अन्य ३४ गावांसाठीची प्रादेशिक पाणीयोजना पांगरे बुद्रुक प्रादेशिक योजना, संगमेश्वर प्रादेशिक पाणीयोजना, ओवळी-कळवकवणे वालोटी प्रादेशिक योजना, वाशिष्टी खोरे, कोळकेवाडी ग्रायव्हिटी प्रादेशिक पाणीयोजना, सावर्डे पाणीयोजना, हर्णे प्रादेशिक पाणीयोजना, जालगाव ब्राह्मणवाडी प्रादेशिक योजना, पालगड पाणीपुरवठा योजना, बुरोंडी पाणीपुरवठा योजना, धोपावें पाणीपुरवठा योजना अशा एकूण १२ पाणीयोजना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर आहेत. यामध्ये सर्वांत मोठी योजना मिऱ्या-शिरगाव-निवळी ही आहे. ११२ कोटी ५९ लाखांची ही योजना असून, ती ३५ गावांसाठी आहे. योजनेचे काम सुरू झाले असून, ३३ टक्के काम झाले आहे. १६ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहेत.

बक्षीसपत्र नाही – काम सुरू असलेल्या पाणीयोजनांवर आतापर्यंत ६३ कोटी २४ लाख रुपये खर्च झाले आहेत; परंतु जयगड प्रादेशिक योजनेचा टप्पा २, मिया-शिरगाव- निवळी, पांगरे बुद्रुक, वाशिष्टी खोरे आणि सावर्डे या सहा पाणीपुरवठा योजनांचे काम ठप्प झाले आहे. खासगी जागेतून या योजना जाणार आहेत. अजून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनांचे काम ठप्प आहे. जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

RELATED ARTICLES

Most Popular