28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeChiplunपावसाळ्यात धोका टाळण्यासाठी १५ गावांमध्ये बांबूची लागवड

पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी १५ गावांमध्ये बांबूची लागवड

पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी १५ गावांमध्ये बांबू लागवड तर १९ ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळा काही महिन्यांवरच येऊन ठेपल्यामुळे मागील पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनाने वेग धरला आहे. चिपळूण आणि लगतच्या परिसरामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झालेली त्यामुळे अनेकांची अवस्था बेघर झालेली. अनेकांचे सामान देखील वाहून गेल्याने, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्ष होत आले तरी अजून अनेक कुटुंब सावरतच आहेत. या संकटावर काही उपाययोजना करण्यासाठी, पाण्याचा निचरा होण्यासाठी काही तरी भक्कम उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाचे प्रकार कोकणातील प्रामुख्याने चिपळूण, खेड, राजापूर व संगमेश्‍वर तालुक्यात आले. याचा अभ्यास करून भूवैज्ञानिकांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी १५ गावांमध्ये बांबू लागवड तर १९ ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांबूची लागवड केल्याने पाण्याचा निचरा तर होतोच शिवाय पाणी अडवण्यासाठी देखील बांबूचे वन उपयोगी पडते.

गतवर्षी २२ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरासह परिसराला महापुराने विळखा घातला होता. कोट्यावधींची हानी झाली. त्यामधून बाधित कुटुंबे सावरली असली तरी, भविष्यात पुराची धास्ती कायम राहिली आहे. अतिवृष्टीत चिपळूण तालुक्यातील पेढे कुंभारवाडीसह पूर्व विभागातील दसपटी विभागात भूस्खलन झाले होते.

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील तिवरे, ओवळी, नांदिवसे, कोळकेवाडी आदी १९ ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत आपत्तीचा धोका आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या आहेत. १५ गावांत तीव्र डोंगर उतारावर बांबूची लागवड करावी लागणार आहे. जेणेकरून माती न धासळता बांबूची मुळे तग धरून राहतील.

RELATED ARTICLES

Most Popular