27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriमिऱ्याबंदर साडेतीन किमी बंधार्‍यामधील ४ धोकादायक जागांच्या दुरूस्तीला प्राधान्य

मिऱ्याबंदर साडेतीन किमी बंधार्‍यामधील ४ धोकादायक जागांच्या दुरूस्तीला प्राधान्य

सुरक्षेच्या दृष्टीने पत्तन विभागाने या चार भागांच्या दुरूस्तीचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. त्यामुळे मिर्‍यावासियांना यंदाच्या पावसाळ्यात धोक्याखाली रहावे लागणार नाही.

रत्नागिरीमधील मिऱ्याबंदर भागामध्ये प्रत्येक वर्षी पावसाच्या मोसमामध्ये अनेक ठिकाणी घरामध्ये, बागांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. प्रत्येक पावसाळ्याला मिऱ्यावासियांना या पावसाच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये मिऱ्या वासीय आंदोलन करून सरकारला जागे करत असतात आणि योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात.

समुद्राच्या माऱ्याने धुपप्रतिबंधक बंधारा देखील अनेकदा खचतो, त्यातील दगड, माती वाहून जाते. वाळू ढासळत असल्याने दगड सुद्धा समुद्रात जातात. आणि मग पाण्याचे उधान, त्यात वाऱ्याचा वेग यामुळे समुद्र गाव गिळंकृत करतो कि काय! अशी परिस्थिती निर्माण होते. मिर्‍या गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर असून काही प्रमाणात त्याचे काम झाले आहे. मात्र पावसाळा तोंडावर असल्याने साडेतीन किमी बंधार्‍यामधील ४ डेंजर स्पॉटच्या दुरूस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पत्तन विभागाने या चार भागांच्या दुरूस्तीचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. त्यामुळे मिर्‍यावासियांना यंदाच्या पावसाळ्यात धोक्याखाली रहावे लागणार नाही. या बंधार्‍याच्या कामातूनच ही दुरूस्ती होणार आहे.

भगदाड पडलेल्या भागात बंधार्‍यासाठी आणलले दगड तात्पुरते वापरून पुन्हा तेच दगड पक्क्या बंधार्‍याच्या कामाला वापरता येणार आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष घातल्याने मिर्‍याच्या साडेतीन किमीच्या बंधार्‍याला १८९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे हा पावसाळा तरी मिऱ्यावासियांना सुखाची झोप मिळू शकेल. नाहीतर पावसाच्या भीतीने, समुद्राची पातळी वाढेल आणि पाणी शिरेल कि काय अशा भीतीच्या सावटाखाली प्रत्येक पावसाळा काढावा लागत असे.

RELATED ARTICLES

Most Popular