25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunचिपळूण उड्डाणपुलाचे काम सहा महिने ठप्प

चिपळूण उड्डाणपुलाचे काम सहा महिने ठप्प

नव्याने डिझाईन तयार केले असले तरी त्याला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. ऑक्टोबरमध्ये पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या पुलाचा नव्याने डिझाईन तयार केले असले तरी त्याला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किमी दरम्यानच्या या चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत सुमारे पावणेदोनहून अधिक किमीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

४६ पिलरवर उभा राहणाऱ्या या पुलाचा काही भाग गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कोसळला होता. पूल उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्यानंतर सध्या या पुलाचे डिझाईन बदलण्यात येणार असून नव्याने तयार केलेले डिझाईन अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग मुख्य अभियंता शेलार यांनी अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह या पुलाची पाहणी केली. नव्या पुलाच्या डिझाईनमध्ये काही बदल सुचवले असून यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर हे २० मीटरवर ठेवून अतिरिक्त पिलर उभा करून गर्डर सिस्टीम करण्याचे सुरू आहे. या सर्व गोष्टींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करत स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular